शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

गौरवास्पद.. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारला कोविडसाठी एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 6:26 PM

सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे.

अहमदनगर : सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारी जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरच्या उभारण्यासाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. शिक्षकांच्या स्तुत्य उपक्रमाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभेत दखल घेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

दोन महिन्यांत जिल्ह्यात करुणा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या महामारीत जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी अन्य घटकांसोबत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वत:हून पुढे आले आहेत. त्यांनी कोविड सेंटर आणि कृतज्ञता निधीच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. जिल्ह्यातील या सर्व शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत पारित करण्यात आला.

उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक सभा ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी जागतिक माहामारीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, अधिक्षक (शालेय पोषण आहार), विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून कोविड सेंटर उभारणी व कृतज्ञता निधी उभारुन उल्लेखनिय काम केले. शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिकचा निधी कोविड उपचारासाठी मिळाल्याबद्दल शिक्षण समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांना यशस्वीपणे सामोरे जाता यावे, शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यासाठी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर इयत्ता ४ थी व ७वीच्या विदयार्थ्यासाठी अहमदनगर टॅलेंट सर्च या उपक्रमांतर्गत २०२१-२२ पासून जानेवारी महिन्यांत परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा नगर जिल्हा परिषद स्वतंत्रपणे घेणार असून कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर परीक्षेच्या स्वरूपाचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात जूनपासून शाळा सुरू होण्यापूर्वी दाखलपात्र विदयार्थ्यांचे १०० टक्के शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवून त्यांना ३१ मे पूर्वी शाळेत दाखल करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आल्या. या ऑनलाईन सभेला सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, धनजंय गाढे, गणेश शेळके, उज्वलाताई ठुबे, विमलताई आगवण, सुवर्णाताई जगताप हजर होते. यासह प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ, १४ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणारे गुलाब सय्यद, आणि सर्व शिक्षा अभियानाचे लेखाधिकारी सुरेश हजारे यांचा सन्मान करण्यात आला.

शिल्लक पोषण आहाराचे वाटप

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारातील तांदूळ आणि कडधान्य शिल्लक आहे. शिल्लक असणारा पोषण आहार वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद विभागाने शिक्षण संचालक यांच्याकडे परवानगी मागितली होती. ती परवानगी मिळाल्याने आता या पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना घरपोहच वाटप होणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदAkoleअकोलेTeacherशिक्षक