शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Ganesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 8:19 AM

गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.

अहमदनगर: गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. सहा मंडळांनी प्रवरा संगम येथे जाऊन गणेश मूर्तींचे विसर्जन केले. दरवर्षी 12 पर्यंत चालणारी मिरवणूक यंदा नऊ वाजताच संपली.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी केली होती. मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, असा अट्टहास पोलिसांकडे धरला होता.पोलिसांनी नकार दिल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.मिरवणुकीत विशाल गणपती, महालक्ष्मी' कपिलेश्वर दोस्ती, आदिनाथ व आनंद तरुण मंडळ हे सहभागी झाले होते. नवरत्न, समझोता, नीलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ यांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सहा मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करत नऊ वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. दरम्यान सावेडी येथील तीन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

विशाल गणपतीची मिरवणूक लक्षवेधी नगर शहराचे ग्रामदैवत  असलेल्या विशाल गणपतीची मिरवणूक यंदाही नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरलि. रविवारी सकाळी ८:३०ला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुजा होऊन गणपतीचे विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.लेझीम ढोलताशांचा गजर आणि फुलांची उधळण.गणराया जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हा मिरवणूक सोहळा रंगला.  सात वाजेच्या दरम्यान विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव