एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:33+5:302021-02-09T04:24:33+5:30

अहमदनगर : जिल्ह्याच एकाच दिवशी सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला. सोमवारी १०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ७४ जणांना ...

Five people died on the same day | एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

Next

अहमदनगर : जिल्ह्याच एकाच दिवशी सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला. सोमवारी १०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ७४ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १०९१ जणांवर शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३, नगर ग्रामीण २, पारनेर ७, पाथर्डी ६, संगमनेर १, श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात १५, अकोले १, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर ८, राहाता ७, संगमनेर ६, शेवगाव ३, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळून आले. नगर शहर २, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १, नेवासा ४, राहाता ५ आणि श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी ७४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ८३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे.

-------- कोरोनाची जिल्ह्याची स्थिती

एकूण रुग्ण संख्या : ७३०३७

बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ७०८३३

उपचार सुरू असलेले रुग्ण : १०९१

मृत्यू : १११३

Web Title: Five people died on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.