टाकळीमियाँ येथे पूर्ववैमनस्यातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:54+5:302021-01-21T04:18:54+5:30

पोलीस सूत्रांची माहिती अशी की, १४ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेदरम्यान रमेश जालिंदर गोसावी (रा.टाकळीमियाँ, ता.राहुरी) हे त्यांच्या घरासमोर ...

Fighting at Purvaimanasya at Taklimiyan | टाकळीमियाँ येथे पूर्ववैमनस्यातून हाणामारी

टाकळीमियाँ येथे पूर्ववैमनस्यातून हाणामारी

Next

पोलीस सूत्रांची माहिती अशी की, १४ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेदरम्यान रमेश जालिंदर गोसावी (रा.टाकळीमियाँ, ता.राहुरी) हे त्यांच्या घरासमोर असताना, आरोपी पद्माबाई गोसावी, अनिल गोसावी, सुनील गोसावी, सुनील जाधव, बाळू शिंदे, पप्पू शिंदे (सर्व राहणार टाकळिमियाँ) व इतर तिघे जण असे एकूण दहा जण मिळून रमेश गोसावी यांच्या घरासमोर गेले. त्यांनी रमेश गोसावी यांची पत्नी व मुलगा यांना लोखंडी गज, लोखंडी बैलगाडीच्या शिवळाने तसेच काठीने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

रमेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत रमेश गोसावी, प्रवीण गोसावी, सचिन गोसावी, सविता गोसावी हे चारजण जखमी झाले आहेत.

दहा आरोपींपैकी सुनील बाबासाहेब गोसावी याला अटक करण्यात आली आहे. त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Fighting at Purvaimanasya at Taklimiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.