अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:57+5:302021-07-05T04:14:57+5:30

ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर, छायाचित्रकार अण्णासाहेब काळे, तानाजी मुसळे, नितीनकुमार बनसोडे, बाबासाहेब खुडे, बजरंग केदार, शिवदास शेटे, दीपक ...

Establishment of Akhil Bharatiya Marathi Tamasha Parishad | अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेची स्थापना

अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेची स्थापना

googlenewsNext

ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर, छायाचित्रकार अण्णासाहेब काळे, तानाजी मुसळे, नितीनकुमार बनसोडे, बाबासाहेब खुडे, बजरंग केदार, शिवदास शेटे, दीपक जाधव, शफी शेख आदी यावेळी उपस्थित होते. परिषदेच्या सचिवपदी मोहित नारायणगावकर, खजिनदारपदी किरणकुमार ढवळपुरीकर, मयूर महाजन, उपाध्यक्षपदी शेषराव गोपाळ (खान्देश विभाग), महादेव देशमुख (सातारा विभाग), आगर नागजकर (सांगली), राजू बागुल (अहमदनगर, नाशिक विभाग), सुनील वाडेकर (कराड विभाग) तर संचालक म्हणून आविष्कार मुळे, शिवकन्या बढे, शांताबाई संक्रापूरकर, बंडूनाना धुळेकर, पुष्पा बरडकर, लता विरळीकर, नामाभाऊ अंजोळेकर, वसंतराव नांदवळकर, गुलाबराव हडशीकर, मुसाभाई इनामदार, संगीता महाडिक, रूपा प्रिंपीकर, संजय हिवरे, एल. जी. शेख, अविनाश पवार, दीपाली पाटणकर, संजय महाडिक आदींची निवड करण्यात आली.

महाराष्ट्राच्या तमाशाचा २५० वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे. परंतु १९४९ मध्ये तमाशावर बंदी आली. त्यावेळी बाळासाहेब देसाई, मामा वरेरकर आदी मंडळींच्या उपस्थितीत एक समिती स्थापन झाल्यानंतर त्या काळातील तमाशांचे फड मालक एकत्र आले होते. त्यानंतर मात्र, शासनाने बोलाविलेल्या बैठकीखेरीज तमाशांचे फड मालक स्वत:हून कधीही एकत्र आले नव्हते. परंतु त्यानंतर आजची ही ऐतिहासिक बैठक ठरली. संगमनेर तालुक्यातील झोळे गावात महाराष्ट्रातील बहुतांशी तमाशांचे फड मालक एकत्र आले. त्यांच्या सगळ्या संघटना आहेत. त्या एकत्र झाल्या, त्या सर्वांना विलीन करत अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेची स्थापना करण्यात आली. तमाशा कलाकारांची शासनाकडे नोंद करणे, तमाशा कलावंतांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय या बैठकीत घेत विविध ठराव संमत करण्यात आले. तसेच आगामी काळात तमाशा कलावंतांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील बैठकीत घेण्यात आल्याचे डॉ. खेडलेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...................

फोटो नेम : ०४ तमाशा परिषद

ओळ : बैठकीत मार्गदर्शन करताना तमाशा कलावंत रघुवीर खेडकर.

Web Title: Establishment of Akhil Bharatiya Marathi Tamasha Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.