The encroachment owner will run | अतिक्रमणधारक होणार मालक
अतिक्रमणधारक होणार मालक

अहमदनगर : अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल झालेले, पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा चालविलेल्या घटना आत्तापर्यंत सर्वांनाच परिचयाच्या झाल्या आहेत़ मात्र, आता अतिक्रमणांवर हातोडा चालविण्याऐवजी अतिक्रमण करणाऱ्यांनाच त्या जागेची मालकी देण्यात येणार आहे़ त्यासाठी राज्यातील १ लाख व नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणांची मालकी अतिक्रमणधारकांना देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़
अतिक्रमित जागेचे क्षेत्र ठरवून त्यावर दंड आकारुन ती जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती ग्रामसेवकांकडून मागविण्यात येत आहे़ पहिल्या टप्यात ३ हजार १४० अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असून, ज्या जागांची माहिती अपूर्ण होती, त्या गावांतील ग्रामसेवकांची शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक झाली़ या बैठकीत अपूर्ण माहिती असलेल्या जागांचा तपशील देत संबंधित ग्रामसेवकांकडून त्या जागेची माहिती, फोटो मागविण्यात आले़
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी ग्रामसेवकांना अपूर्ण माहितीबाबत सूचना दिल्या़ गावस्तरावर गावठाण हद्दीतील अतिक्रमणांची संख्या मोठी आहे़ पहिल्या टप्प्यात ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ अतिक्रमणधारकांकडून जागेच्या क्षेत्रावर निश्चित दंड आकारुन त्यांना ती जागा नियमित करुन देण्यात येणार आहे़ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जागांबाबत जिल्हा परिषद निर्णय घेणार आहे़ तर इतर विभागाच्या जागांचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे़

जिल्हा परिषदेच्या सुमारे ८ हजार जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहेत़ या अतिक्रमणांवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये वारंवार वादंग झाले आहेत़ प्रत्येक सभेला अधिकाºयांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्यांना दिले़ मात्र, अद्याप जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात आलेली नाहीत़ त्याशिवाय काही नगरपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या जागा बळकावून त्यावर पक्की बांधकामे केली आहेत, अशा नगरपालिकांकडून भाडे वसूल करण्याचा ठरावही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता़ मात्र, त्यावरही पुढे काहीच झालेले नाही़

गावठाण हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ त्यासाठी माहिती भरण्याचे काम सुरु आहे़ अतिक्रमित जागेच्या क्षेत्रानुसार ठराविक रक्कम आकारुन त्या जागा नियमित करण्यात येणार आहेत़ -प्रशांत शिर्के, उपमुख्यकार्यकारीअधिकारी

Web Title: The encroachment owner will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.