शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मच्छिमारीसाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:21 PM

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जलाशयात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी मच्छिमार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा शिवारात घडली.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जलाशयात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी मच्छिमार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा शिवारात घडली.सुभाष बापू घोलवड (वय ३२) असे या मयत युवकाचे नाव आहे. हा युवक पिंपळगाव पिसा हद्दीत आठाचा मळा शिवारात चौधरी यांच्या विहिरीजवळ मासेमारीसाठी गेला होता. त्याठिकाणी विद्युत वाहिन्या व विद्युत मोटारींचे जाळे तयार झालेले आहे. विसापूर धरण ओव्हरफ्लो होत आल्याने चौधरी यांच्या विहिरीसह काही केबल व विजेचे पोल तर थेट धरणाच्या पाण्यात गेले आहेत. सुभाष घोलवड हा युवक शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ज्यावेळी मासे पकडण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला त्यावेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  यानंतर तो होऊन पाण्यात बुडाला. त्यावेळी धरणाच्या कडेला त्याची लहान दोन मुले व एक मुलगी उभे होते. वडील पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केली. तेथून जवळच रहात असलेल्या मच्छिमार बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत प्रवाह खंडित करुन त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत संतोष शंकर पवार यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक बजरंग गवळी करीत आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी