शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मद्यधुंद तहसिलदाराचे परिचारिकेशी असभ्य वर्तन, अखेर कोपरगावात गुन्हा दाखल

By रोहित टेके | Published: February 26, 2023 12:51 PM

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी  परिचारिका शनिवारी रात्रपाळीला डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले.

रोहित टेके

कोपरगाव :  कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेशी मद्यधुंद तहसीलदारांनी असभ्य वर्तणूक व शिवीगाळ केल्याची घटना  कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी(दि. २५) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी परिचारिकेच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बोरुडे असे गुन्हा दाखल झालेल्या तहसीलदारांचे नाव आहे.     कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी  परिचारिका शनिवारी रात्रपाळीला डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले. व परिचारिकेस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर परिचारिकेने दिलेला डयुटी तक्ता फेकून दिला. तसेच परिचारिकेच्या मोबाईलवरून वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर कर्तव्यावर असलेले कक्षसेवक सचिन ठोंबरे यांना दवाखाण्याच्या बाहेर काढून दिले. त्यानंतर परिचारिकेच्या अंगावरून हात फ़िरवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तेथेच एका रुग्णांची नातेवाईक असलेल्या एका मुलीच्या अंगावरून देखील हात फिरवला व शिवीगाळ करीत निघून गेले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसKopargaonकोपरगाव