अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:36 AM2018-05-04T11:36:53+5:302018-05-04T11:36:53+5:30

केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Discontinuance of Article 308 on Shiv Sainiks in Ahmadnagar, Political Press | अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

अहमदनगरमधील शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले, राजकीय दबावाची चर्चा

Next
ठळक मुद्देकेडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली गुन्ह्याबाबत पोलिसांचे घूमजावअद्याप आरोपींना अटक नाहीपोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

अहमदनगर : केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी पोलिसांनी हे कलम स्वत:च वगळले. सरकारच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी हे कलम वगळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अद्याप या आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, या गुन्ह्यातील सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे कलम ३०८ वगळले आहे. त्याऐवजी ‘दगडफेक आणि दुखापत’ (कलम ३२४, ३३६, ३३७) असा उल्लेख असणारी कलमे वाढविण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसांत शिवसैनिकांचे अटकसत्र सुरु करु, असे पोलीस सांगत आहेत. केडगाव येथे शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी जो गोंधळ घातला त्याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी स्वत: फिर्याद दिलेली आहे.
केडगाव येथे राठोड यांसह शिवसैनिकांनी शासकीय वाहनांवर दगडफेक केली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नगर-पुणे रस्त्यावर दगडफेक करुन प्रवास करणाऱ्यांच्या जीवितास धोका होईल, असे वर्तन केले. नागरिकांच्या घरावर
दगडफेक केली, असे या फिर्यादीत म्हटले होते.

पोलीस म्हणतात गंभीर दुखापत नाही
पोलिसांनी शिवसैनिकांवरील आरोपांची तपासणी केली. केडगाव येथे झालेल्या दंगलीनंतर कोणालाही गंभीर दुखापत आढळली नसल्याने सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे ३०८ कलम वगळण्यात आल्याचा दावा, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केला आहे. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्यानंतर त्यांच्याविरोधातही ३०८ कलम लावण्यात आले आहे. हे कलम मात्र कायम आहे. त्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी अडचणी येत आहेत.
पोलिसांनी राजकीय दबावातून शिवसैनिकांवरील कलम मागे घेतले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ओंकार गिरवलेचा जामीन फेटाळला
ओंकार कैलास गिरवले हे पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांचे वडील कैलास गिरवले हेही आरोपी होते. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात ते पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जाताच त्यांना दारुबंदी कायद्यांतर्गत दुसºया गुन्ह्यात अटक करण्यात आली. या अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोेलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यांचा मुलगा ओंकार याने आपल्या जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, हा अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला.

  • पोलीस अधीक्षक म्हणतात नंतर बोलू

शिवसैनिकांविरोधातील कलम मागे घेतले आहे का? असा प्रश्न गुरुवारी पत्रकारांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना केला. मात्र, त्यांनी याबाबत उत्तर दिले नाही. आजची पत्रकार परिषद जामखेड हत्याकांडाबाबत असल्याने याबाबत नंतर बोलू असे ते म्हणाले.

Web Title: Discontinuance of Article 308 on Shiv Sainiks in Ahmadnagar, Political Press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.