कोपरगावच्या तहसीलदारांवरील खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी; तलाठी, महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

By रोहित टेके | Published: February 28, 2023 04:51 PM2023-02-28T16:51:57+5:302023-02-28T16:52:37+5:30

परिचारिकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून विनयभंगाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Demand cancellation of false case against Tehsildar of Kopargaon; Talathi, revenue employees union strike | कोपरगावच्या तहसीलदारांवरील खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी; तलाठी, महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

कोपरगावच्या तहसीलदारांवरील खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी; तलाठी, महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

googlenewsNext

कोपरगाव : तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे हे शनिवारी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी उपस्थित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत, परिचारिकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून विनयभंगाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत  मंगळवारी (दि.२८) सकाळपासून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान तहसीलदारबोर्डे यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
 

Web Title: Demand cancellation of false case against Tehsildar of Kopargaon; Talathi, revenue employees union strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.