बंधारा फुटण्याचा धोका; आठ कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 10:29 AM2020-10-25T10:29:27+5:302020-10-25T10:30:10+5:30

संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील बंधाºयास तडा गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आश्वी बुद्रुक येथील आठ कुटुंबांना महसूल प्रशासनाने  तातडीने सुरक्षितस्थळी हालविले आहे. 

Danger of dam burst; Eight families were evacuated | बंधारा फुटण्याचा धोका; आठ कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविले

बंधारा फुटण्याचा धोका; आठ कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविले

Next

आश्वी : संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील बंधाºयास तडा गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आश्वी बुद्रुक येथील आठ कुटुंबांना महसूल प्रशासनाने  तातडीने सुरक्षितस्थळी हालविले आहे. 

   पाणी टंचाई ने नेहमीच त्रस्त असलेल्या निमगावजाळीसह  आश्वी परिसरातीलगावांमध्ये परतीचा पावसाने धुमाकूळ  घातला आहे.  या पावसाने कित्येक वर्षे बंद असलेले ओढे, नाले वाहते झाले आहेत. बंधारे भरलेत. त्यातच निमगावजाळी शिवारातील दत्त मंदिराजवळील बंधाºयाला तडा गेल्याने त्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर आश्वी  शिवारातील तुडुंब भरलेल्या   माती  बंधाºयात येत आहे. हे दोन्ही  बंधारे शनिवारी रात्री फुटण्याची शक्यता निर्माण झाली. 

 प्रशासनाने आठ कुटुंबांना आश्वी बुद्रुक येथील आश्वी इग्लिश स्कूलमध्ये सुरक्षित स्थलांतरित केले आहे.

Web Title: Danger of dam burst; Eight families were evacuated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.