पीक विम्यात कोट्यवधीचा घोटाळा : शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:16 PM2019-06-23T15:16:51+5:302019-06-23T15:17:36+5:30

नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही.

Crores of scams in crop insurance: Shivsena's allegation | पीक विम्यात कोट्यवधीचा घोटाळा : शिवसेनेचा आरोप

पीक विम्यात कोट्यवधीचा घोटाळा : शिवसेनेचा आरोप

Next

केडगाव : नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही. पण यातील अवघ्या फक्त १० हजार ५४ लोकांनाच विमा मिळाला. विमा कंपनी आणि कृषी विभाग यांनी नियोजन करून कोट्यवधीचा फायदा विमा कंपन्यांना मिळवून दिला असून नगर तालुक्यातील १९ हजार ५२३ शेतकरी विम्यापासून वंचीत ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, नगरसेवक दिलीप सातपुते, प्रविण कोकाटे, आबासाहेब कोकाटे, तालुका प्रमुख राजू भगत, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला़ याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले, पूर्वी सर्वंकष पिक विमा होता आणि शासनाच्या जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विम्याचा कारभार होता. त्यावेळी नगर तालुक्यात २०१४-१५ मध्ये ६२ टक्के, २०१५-१६ मध्ये ७५ टक्के, २०१६-१७ मध्ये २३ टक्के लोकांना विम्याचा लाभ झाला. पण पंतप्रधान पिक विमा योजनेत खाजगी कंपन्याकंडे विमा दिला गेला त्यावेळी २०१७-१८ मध्ये १६ टक्के आणि २०१८-१९ ला ४८ टक्केच विमा मिळाला.

Web Title: Crores of scams in crop insurance: Shivsena's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.