शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नागरदेवळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; सदस्याचा जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:00 PM

सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतमध्ये रस्त्यांची कामे न करताच पूर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बीले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मंगळवारी सकाळी महेश झोडगे रॉकेल घेऊन जिल्हा परिषदेत आले़ त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात प्रवेश केला. तेथे झोडगे यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत झोडगे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

२७ फेबु्रवारी रोजी महेश झोडगे यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र देऊन ग्रामपंचायतीतील घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ही कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. झोडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण (खर्च १० लाख), अंतर्गत गटारीचे काम (खर्च २ लाख ५० हजार) या दोन्ही कामांचा पुर्णत्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व विभागीय अभियंता यांच्या स्वाक्षरीने १ सप्टेंबर २०१७ रोजी देण्यात आलेला आहे. याशिवाय १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मधुरानगरी येथे २ लाख ५० हजार खर्चुन रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण केल्याचा दाखला १० आॅगस्ट २०१७ रोजी देण्यात आलेला आहे. या पुर्णत्वाच्या दाखल्यांमुळे संबंधित कामांची बीलेही काढण्यात आलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र पुर्णत्वाच्या दाखल्याच्या दिनांकापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कामे सदर ठिकाणी झालेले नाहीत. त्यामुळे या कामांची बोगस बीले काढून संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांच्या इतर साथीदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केलेला आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करुन संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी झोडगे यांनी केली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर