शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

कोरोना टेस्ट लॅब ठरणार वरदान-डॉ़ प्रदीप मुरंबीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:54 AM

नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय हे कोरोना हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोनाचे चाचणी केंद्र सुरु होणार असून, तेथील कोरोना टेस्ट लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी साधलेला संवाद.

संडे स्पेशल मुलाखत अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय हे कोरोना हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोनाचे चाचणी केंद्र सुरु होणार असून, तेथील कोरोना टेस्ट लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : कोरोनाच्या चाचणीसाठी सध्याची व्यवस्था काय आहे?कोरोना चाचणीसाठी प्रारंभी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेकडे संशयित रुग्णांचे स्त्राव पाठविले जात होते. परंतु तेथे मोठ्या संख्येने चाचणीसाठी स्त्राव येऊ लागल्याने नगरचे स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील लष्कराच्या प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या लष्कराच्या वैद्यकीय प्रयोगशाळेत नगरमधून पाठविलेले स्त्राव तपासले जात आहेत. प्रश्न : जिल्हा शासकीय रुग्णालयात काय सुविधा आहेत?जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत आयसीयु सेंटर आहे. जेथे सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येते. गंभीर स्थितीत हे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु सेंटरमध्ये आणले जातात. त्याशिवाय आपल्याकडे व्हेंटीलेटर, डॉक्टरांसाठी पीपीई कीट व एन-९० मास्क अशा कोरोनासाठीच्या प्रतिबंधात्मक व उपचारासाठी लागणा-या सर्व सुविधा आहेत. एका आठवड्यात ८ ते १० फिजिशियन नियुक्त केले आहेत. त्यामुळे आपल्याकडे पूर्ण सुविधा आहेत. आता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब उभी राहत आहे. प्रश्न : रुग्णसंख्या वाढल्यास तशी व्यवस्था आपल्याकडे आहे का?कोरोना टेस्ट लॅब सुरु झाल्यानंतर सर्व चाचण्या नगरमध्येच होतील. चाचण्यांची संख्याही त्यामुळे वाढविता येणार आहे. लवकर निदान झाल्याने रुग्णांना उपचारही लवकर मिळतील. त्याशिवाय जिल्ह्यात २२ कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या कोरोना केअर सेंटरमध्ये कमी त्रास होणा-यांना ठेवण्यात येणार असून, तेथेच उपचार केले जाणार आहेत. ज्यांना जास्त त्रास होतो, अशा  रुग्णांची जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही खासगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास काहीही घाबरण्याचे कारण नाही. आपण पुरेशी व्यवस्था केलेली आहे.ही लॅब कधी सुरु होईल?कोरोनाच्या महामारीविरोधात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असून, पुढील ४ ते ५ दिवसात नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब सुरु होणार आहे. ही लॅब सुरु करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे एका दिवसात सुमारे १०० चाचण्या होऊ शकतात़. या लॅबमधील सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मायक्रोबायोलॉजिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. या लॅबमध्ये कोरोनासह इतर सर्व आजारांच्या चाचण्या करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे ही लॅब नगरकरांना आरोग्याच्या दृष्टिने वरदान ठरणारी आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरinterviewमुलाखत