...अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:08 PM2020-06-26T14:08:56+5:302020-06-26T14:25:22+5:30

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती बुवाबाजी संघर्ष समितीच्या सचिव रंजना गवांदे यांनी सांगितले.  

A case has been registered against Indorikar Maharaj at Sangamnera | ...अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरात गुन्हा दाखल

...अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरात गुन्हा दाखल

Next

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती बुवाबाजी संघर्ष समितीच्या सचिव रंजना गवांदे यांनी सांगितले.  

निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनात स्त्री संग सम तिथील झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी होते. स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळविणारी होते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे. 

    जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून संगमनेर न्यायालयात पीसीपीेएनडीटी अ‍ॅक्टनुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी ही फिर्याद दाखल केली  असून या प्रकरणी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्याचे गवांदे यांनी सांगितले.

Web Title: A case has been registered against Indorikar Maharaj at Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.