काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:37 PM2020-08-01T12:37:39+5:302020-08-01T12:38:37+5:30

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

Black dam overflow; Dam filled after ten years | काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

googlenewsNext

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

तब्बल १० वषार्नंतर काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हरफ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली. 

पारनेर तालुक्यातील काळू धरणाची एकूण साठवण क्षमता २९९ दशलक्ष घनफूट आहे. या धरणातून ढवळपुरीसह परिसरातील वाड्यावस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. 

  याशिवाय पळशी २९.८२, तिखोल २१.२०, भाळवणी ६.२२, ढोकी नं. १  ६.७७, ढोकी नं.२  १०.४४ दशलक्ष घनफूट पाणी या तलावात आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक होत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.   

     काळू प्रकल्प २०११ व २०१७ साली पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याबरोबर तलाव पूर्ण क्षमतेने  भरल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामातील ज्वारी, वाटाणा, टोमॅटो आदी पिके शाश्वत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 
 

Web Title: Black dam overflow; Dam filled after ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.