शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

आठवड गावात ४० एकरवर फुलविले जैव विविधता उद्यान;  पाच हजार झाडांचे संगोपन; रोपवाटिका, विश्रामगृहाची व्यवस्था

By अनिल लगड | Published: June 05, 2020 12:40 PM

नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

जागतिक वन दिन विशेष /   

अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील नगर -जामखेड रोडवरील आठवड हे छोटेसे गाव. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार मिळाला. यासाठी गावचे सरपंच राजेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़ आठवड ग्रामपंचायतीला पडीक जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणी म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन आहे. या जमिनीचा ग्रामपंचायतीमार्फत ६ ते ७ हजाराला तीन वर्षासाठी लिलाव होत असे. हा लिलाव पिढ्यान्पिढ्या चालू होता. अनेक जण दोन दोन हजार रुपये गोळा करुन लिलाव घेत. जमीन कसत. यावरुन अनेकात मतभेद होत. पुढे ही जमीन उद्योजक विजय मोरे यांनी ५० हजाराने लिलावाने घेतली. लिलावाची रक्कम ग्रामपंचायतीला विकासासाठी दिली जाते.

 राज्य सरकारमार्फत स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने एक कोटी खर्चून जैव विविधता उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारतर्फे नगर जिल्ह्यात आठवड (ता. नगर) व संगमनेर तालुक्यातील नांदुर्खी या दोन गावांची निवड झाली. आठवड येथे म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन यासाठी दिली. सरकारमार्फत तीन वर्षापूर्वी या ठिकाणी काम सुरू झाले. या उद्यानात सुमारे ५ हजार लहान मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात गेस्ट हाऊस, वनौद्यात येणा-या नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांची खेळणी, प्राण्यांचे पुतळे, वेलवर्गीय झाडे लावली. ही झाडे सध्या चांगली बहरली आहेत. यातून गावातील २० ते २५ तरुणांना रोजगार मिळाला आहे.  

उद्यानात रोपवाटिका उभारली आहे.  यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी येथे परजिल्ह्यातून पर्यटनप्रेमींची वर्दळ वाढत आहे. या उद्यानामुळे परिसरात पर्यावरणाला चालना मिळाली. गावात दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या ९ एकर पडीक जागेवरही ८ हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. यावर चिंच, जांभूळ, आंबा व इतर झाडे फुलविली आहेत. यामुळे गावचे निसर्गसौंदर्य चांगले फुलले आहे. स्वखर्चातून गावात कामेआठवड गावात अनेक सुशोभिकरणाची कामे स्वखर्चाने केली आहे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय मोरे यांचे मोठे योगदान आहे. गावाच्या विकासासाठी ते स्वत: निधी देतात. त्यांनी गावातील मागासवर्गीय अनेक नागरिकांना स्वखर्चातून शौचालये बांधून दिली आहेत. गावात स्वच्छता, भुयारी गटार योजना, ग्रामपंचायत इमारत, रस्ते काँक्रिटीकरण ही कामे ग्रामपंचायतीने केली आहेत. दोन वर्षापासून मी स्वत: स्वखर्चाने कचरा गाडीने गावातील कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावत आहे, असे सरपंच राजेंद्र मोरे यांनी सांगितले.

 उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. शासनामार्फत या उद्यानाची देखरेख होत आहे. सरकार हे उद्यान ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्याच्या तयारीत आहे. परंतु या उद्यानाची देखभाल ग्रामपंचायत करु शकत नाही. यासाठी निधीची आवश्यकता भासेल. सध्या येथे शासनाची रोपवाटिका आहे. त्यामुळे त्याची देखरेख चांगली होत आहे.-राजेंद्र मोरे, सरपंच, आठवड, ता. नगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरण