Attack on youth in Parner | पारनेरमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला
पारनेरमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला

पारनेर : शहरातील बंडू मते या युवकावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता पारनेर बसस्थानक परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये मते हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
  पारनेर येथील युवक बंडू मते याने पारनेर बसस्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात चहाचे दुकान गुरुवारपासून सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान चहाच्या दुकानात येऊन तो आवराआवर करीत होता. दोन-तीन तरुणांनी येऊन अचानक बंडूवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यानंतर हल्लेखोर पळून गेले. यानंतर जखमी झालेल्या बंडू मते यास तातडीने नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बंडू मते व पारनेरमधील काही युवकांबरोबर हाणामारी झाली होती. त्याच वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Attack on youth in Parner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.