कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

By रोहित टेके | Published: May 17, 2023 03:55 PM2023-05-17T15:55:18+5:302023-05-17T15:55:36+5:30

अक्षय याने या अगोदर विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. 

Akshay Awhad of Kopargaon has been selected for the Shiv Chhatrapati State Sports Award of the State Government | कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

googlenewsNext

कोपरगाव (जि. अहमदनगर ) : शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयातील खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास सन २०२१-२२ साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्‍याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असलेला ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. 

अक्षय याने या अगोदर विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. सन २०१९ या वर्षी श्रीलंका येथे झालेल्‍या बेसबॉल स्‍पर्धेत त्‍याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्‍व केले होते. या स्‍पर्धेमध्‍ये भारतीय संघाने कास्‍यंपदक पटकावले होते व आव्‍हाड यास बेस्‍ट पीचर म्‍हणून पारितोषिक देण्‍यात आले होते. हा पुरस्कार प्राप्‍त होणारा तो कोपरगाव तालुक्‍यातील प्रथम खेळाडू ठरला आहे.  

Web Title: Akshay Awhad of Kopargaon has been selected for the Shiv Chhatrapati State Sports Award of the State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.