Agitated farmers of onion prices in ahmadnagar | कांद्याचा भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन
कांद्याचा भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

केडगाव : नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट शहर बाह्यवळणावर ठिय्या मांडत आंदोलन सुरु केले.

कांद्याला भाव वाढून मिळावेत यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासन दाखल झाले.सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे बाह्यवळण वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.कांद्याने आर्थिक गणित कोलमडल्याने काही शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Web Title: Agitated farmers of onion prices in ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.