शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा मारहाणीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 5:32 AM

पीडितेच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट

अहमदनगर): वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे भर रस्त्यावर पेट्रोल ओतून प्राध्यापिकेला पेटवून दिल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असताना बुधवारी महिलेवर अत्याचार करणाऱ्यास पिडीतेच्या संतप्त नातेवाईकांनी गावातील सिमेंटच्या बाकास बांधून बेदम मारहाण केल्याने तो ठार झाला. अहमदनगर जिल्ह्यातील शिरपुंजे (ता. अकोले) येथे ही घटना घडली.

राजू गणपत सोनवणे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. शिरपुंजे येथील पीडित महिला मंगळवारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी राजू सोनवणे याने तिच्यावर अत्याचार केला व जंगलात पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी संध्याकाळी जंगलातून शोधून त्याला गावात आणले. सिमेंटच्या बाकड्यास बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्यास राजूर येथे आणले. तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

शिरपुंजे येथील पोलीसपाटील रंगनाथ काळू धिंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

सिल्लोडमध्ये पेटविलेल्या महिलेचा मृत्यू

दरम्यान, औरंगाबादमधील अंधारी (ता. सिल्लोड) येथील घरात घुसून रॉकेल टाकून पेटविलेल्या महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. संगीता प्रभाकर कांबळे (४०)असे मृत महिलेचे नाव आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर