दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; कोपरगाव शहरातील घटना

By रोहित टेके | Published: April 27, 2023 01:34 PM2023-04-27T13:34:54+5:302023-04-27T13:35:14+5:30

दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईकाचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

A policeman passing by on a two-wheeler dies of a heart attack; Incident in Kopargaon town | दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; कोपरगाव शहरातील घटना

दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; कोपरगाव शहरातील घटना

googlenewsNext

- रोहित टेके 

कोपरगाव ( जि.अहमदनगर ) -  दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईकाचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास कोपरगाव शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रसमोरील रस्त्यावर घडली. राजु तुकाराम चव्हाण ( रा. घुमटवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर ) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमदास तारू पवार ( वय ४५, रा. वागळुज, ता. आष्टी, जि. बीड ) यांच्याकडून खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी राजु चव्हाण यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.   

Web Title: A policeman passing by on a two-wheeler dies of a heart attack; Incident in Kopargaon town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.