शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून युवकाचा खून

By admin | Updated: November 18, 2014 15:00 IST

आरोळेवस्तीवर पूर्ववैमनस्यातून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला

ठाण्यासमोर ठिय्या

 
दोघांना अटक : सात जणांवर गुन्हा दाखल
 
जामखेड (जि.अहमदनगर) : येथील आरोळेवस्तीवर पूर्ववैमनस्यातून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे. बाळू जिजाबा माने असे मयताचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील करमाळा रस्त्यालगत असलेल्या आरोळेवस्ती येथे सरकार व समता असे युवकांचे दोन ग्रुप आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये सातत्याने भांडणे होत.
दोन महिन्यापूर्वी दोन्ही ग्रुपमध्ये वाद झाला होता. समता ग्रुपमधील सोनू वाघमारे व इतर पाच जणांविरोधात फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.१७) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समता ग्रुपमधील निखिल घायतडक, दत्ता शिंदे, बाळू जिजाबा माने व संजय महादेव विटकर हे तेथील व्यायामशाळेत गेले होते. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास सरकार ग्रुपमधील सोनू बबन वाघमारे, विक्रम भगवान डाडर, प्रमोद बबन गव्हाळे, युवा राजू डाडर, सुनील राजू डाडर हे तलवार, गज, काठय़ा तर सागर सुभाष गवासणे हे रिव्हॉल्वर घेऊन आले. या सर्व आरोपींनी बाळू जिजाबा माने याच्या छातीवर व गळ्यावर कोयता, काठी, तलवारीने वार केले. त्यामुळे तो बाळू माने रक्ताच्या थारोळ्यात पडला व जागीच मरण पावला. तर सागर गवासणे याने बाळू माने याच्या सोबत असलेल्या निखिल घायतडक, दत्ता शिंदे व संजय विटकर यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. घटनेनंतर वरील सर्व आरोपी दुचाकी व चारचाकी वाहनाने पळून गेले. याबाबत संजय महादेव विटकर यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती पोलिसांना समल्यानंतर परीवक्षाधिन पोलीस उपधीक्षक प्रांजली सोनवणे, हे. कॉ. अनिल देवकर, प्रबोध हंचे, श्यामसुंदर जाधव, मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना व ग्रामस्थांच्या वतीने उद्या (मंगळवारी) जामखेड बंदचे आवाहन केले आहे.
 
ठाण्यासमोर ठिय्या
■ बाळू माने याचे नातेवाईक व नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. 
■ जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनीघेतली. 
■ पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर सुनील राजू डाडर व युवा राजू डाडर यांना अटक केली. त्यानंतर दुपारी मयताच्या नातेवाईकांची पोलिसांनी समजूत काढून साडेचार वाजण्याच्या सुामरास बाळू माने याच्यावर अंत्यसंस्कार केले.