पोहण्यासाठी गेलेल्या युवक विहिरीत बुडाला; शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:54 IST2020-10-17T16:53:50+5:302020-10-17T16:54:38+5:30
शिर्डी शहरातील कालिकानगर येथील एक युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. त्यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

पोहण्यासाठी गेलेल्या युवक विहिरीत बुडाला; शोध सुरू
शिर्डी : शहरातील कालिकानगर येथील एक युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. त्यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. सुरज जाधव असे विहिरीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तो नावाचा १५ वषार्चा आहे. शनिवारी दुपारी तो कालिकानगर येथील एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याने विहिरीत उडी घेतली. परंतु त्यास पाण्याचा अंदाज आला नाही. तो विहीरीत बुडत असताना जवळ असलेल्या युवकांनी पाहिले. तातडीने सुरजचा शोध घेण्यासाठी साई संस्थान आणि शिर्डी नगरपंचायतीची अग्निशमन बंबा आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर विहिर ७० फूट खोल असल्याची माहिती समजली आहे. सूरजचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
|