केबल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:52 IST2021-02-27T12:51:29+5:302021-02-27T12:52:07+5:30

वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.

A young man who went to remove a cable fell into a well and died | केबल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

केबल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

आश्वी : वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.

संगमनेर तालुक्यातील नेहारवाडी खांबे येथील नितीन बापू भोंडे (वय ३७)  हा तरुण सार्वजनीक पाणी पुरवठा करण्याच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतील वीज पंपाची केबल काढत होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

 यावेळी ग्रामस्थांनी त्याला विहिरीबाहेर काढत संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. 

Web Title: A young man who went to remove a cable fell into a well and died