तुम्ही... निळे भात पिकवा, आम्ही ते विकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:51+5:302021-02-05T06:28:51+5:30
कोतूळ येथील स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र कोतूळ येथील जागतिक कृषी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख ...

तुम्ही... निळे भात पिकवा, आम्ही ते विकू
कोतूळ येथील स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र कोतूळ येथील जागतिक कृषी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आरोटे बोलत होते.
आरोटे पुढे म्हणाले, शेतकरी शेतात विविध प्रयोग करतात. मात्र, ते सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. ‘लोकमत’ या वृत्तपत्राने शेतकरी वारसा जपत, माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला निळ्या भाताच्या यशस्वी प्रयोगातून पंतप्रधान कार्यालय ते मुख्यमंत्री इथपर्यंत सन्मान दिला. आता संपूर्ण राज्यातून या भात बियाण्याला मोठी मागणी आहे. या भाताचे कितीही उत्पादन झाले, तरी आम्ही त्याची साळ ७० रुपये किलोने खरेदी करून ग्राहकांना देऊ. यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ, कृषी सहायक सुनिता फटांगरे, एल.व्ही. पवार, स्वामी समर्थ केंद्राचे अशोक देशमुख, सावंत काका, योगेश देशमुख आदी उपस्थित होते.
...
‘लोकमत’ने अकोल्यातील निळे भात देशभर पोहोचविले. नुकतेच ‘बेटर इंडिया’ या इंग्रजी वृत्त वाहिनीने त्याची दखल घेतली. महाराष्ट्रात अकोलेचे नाव उज्ज्वल केले.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले