शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:41 IST2020-05-26T15:40:01+5:302020-05-26T15:41:09+5:30
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. २४ ते २५ मे दरम्यान ही घटना घडली.

शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे दागिने लांबविले
अहमदनगर: नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. २४ ते २५ मे दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ललिता विकास मैराळे (वय ३५ रा़ मुळ घाटकोपर, मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ललिता मैराळे यांचे राळेगण म्हसोबा हे माहेर आहे. कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी त्या गावात आल्या होत्या. मुंबई येथून प्रवास करून आल्याने त्यांना गावातील शाळेत ग्रामसुरक्षा समितीने क्वारंटाईन केले होते.
मैराळे यांनी त्यांच्यासोबतचे सामान याच शाळेत ठेवलेले होते. चोरट्यांनी त्या राहत असलेल्या खोलीची कडी उघडून दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी पोलीस नाईक कदम हे पुढील तपास करीत आहेत.