'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:17 IST2025-09-23T16:17:03+5:302025-09-23T16:17:42+5:30

अहिल्यानगच्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात मुंबईतल्या एका महिलेने फसवणूकीची तक्रार देत गुन्हा दाखल केला.

Woman cheated on the promise of marriage; Case filed against police inspector in Ahilyanagar | 'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

Ahilyanagar Crime: मुंबईमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अहिल्यानगरमध्ये पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्या विरोधात सोमवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक व दमदाटी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे दराडे यांनीही पोलीस अधिक्षकांकडे महिलेविरोधात तक्रार दिली.

ऑगस्ट २०२३ ते २२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान पालघरच्या मानोर इथल्या फार्महाउस आणि जोगेश्वरी वेस्ट मुंबई येथे हा गुन्हा घडल्याची फिर्याद पीडित तरुणीने दिली. पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगालमधील असून, सध्या ती मुंबईमध्ये राहते. दराडे व तिची मुंबई येथे ओळख झाली. दराडे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आपल्यात असलेले अफेअर विसरून जा, असे म्हणून दराडे यांनी तिला शिवीगाळ केली. यानंतर तरुणीने दराडे यांना तुझ्यावर केस करेल, असा इशारा दिला. मात्र दराडे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत तुझ्यावरच केस करेल अशी धमकी दिली, असे या तरुणीने  फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून दराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९, ३५२, ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मानोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा येथील तोफखाना पोलीस ठाण्यात झीरो क्रमांकाने दाखल करून घेत, मानोर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत.

'ती' मला ब्लॅकमेल करत आहे

प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच, त्यांनी फिर्याद देणाऱ्या त्या तरुणीच्या विरोधात सोमवारी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. 'या महिलेने वेगवेगळी कारणे सांगून माझ्याकडून आतापर्यंत पैसे घेतले आहेत. आताही ही महिला माझ्याकडे १ कोटी रुपयांची मागणी करत आहे. पैसे दिले नाहीत, तर तुझ्या विरोधात बलात्काराची खोटी तक्रार देणार आहे, अशी धमकी देऊन माझी पोलिस खात्यात बदनामी करेन, असे म्हणून मला मानसिक त्रास देत आहे, तसेच या महिलेस पोलिस दलातील कोणीतरी मला ब्लॅकमेल करण्यास प्रवृत्त करत आहे. मी या महिलेस दिलेले पैसे, तसेच तिने मला वेळोवेळी केलेले मेसेज माझ्याकडे आहेत. ही महिला आणि माझ्या विरोधात तिला खोटी तक्रार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,' असे दराडे यांनी या तक्रारीत म्हटलं.

Web Title: Woman cheated on the promise of marriage; Case filed against police inspector in Ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.