तरुणीचे अपघाती निधन
By Admin | Updated: November 20, 2014 14:27 IST2014-11-20T14:27:22+5:302014-11-20T14:27:22+5:30
विवाह आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाच बारागावनांदूर येथील तरूणी दुचाकीवर जाताना टॅक्सीच्या धडकेने ठार झाली.

तरुणीचे अपघाती निधन
राहुरी : विवाह आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाच बारागावनांदूर येथील तरूणी दुचाकीवर जाताना टॅक्सीच्या धडकेने ठार झाली.
राहुरी येथील शोरूममधून नवीन दुचाकी घेऊन नीलिमा सुरेश गाडे (वय २४) ही तरूणी जात असताना नगर-मनमाड रस्त्यावर मॅजिक टॅक्सीची धडक तिच्या दुचाकीला बसली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने तिला अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान नीलिमाचे निधन झाले. २८ नोव्हेंबर रोजी नीलिमाचा विवाह होणार होता.
(तालुका प्रतिनिधी)