शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पकडलेली दोन ट्रक तूर कुणाची?

By admin | Updated: May 3, 2017 19:32 IST

तुरीच्या पोत्यांनी भरलेल्या दोन ट्रक मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत़

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ३ - शेवगाव-पाथर्डी रोडवर तुरीच्या पोत्यांनी भरलेल्या दोन ट्रक मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत़ ही तूर नेमकी शेतकरी, व्यापारी की, पाथर्डी बाजार समितीची याचे गौडबंगाल अद्याप उलगडले नसून पोलिसांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती मागितली आहे़ पाथर्डी रोडवरून संशयितरित्या दोन ट्रकमधून तूर वाहून नेत असल्याची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती़ माहिती नुसार पथकाने घटनास्थळी जाऊन त्या दोन्ही ट्रक ताब्यात घेतल्या़ या ट्रकमध्ये सरकारी बारदान्यात तूर भरलेली असल्याचे आढळून आले़ ही तूर नेमकी कोठे भरली आणि कुठे नेण्यात येत होती़ याबाबत विचारणा केली असता़ ट्रकसोबत असलेल्या व्यक्तींना माहिती सांगता आली नाही़ त्यामुळे या ट्रक एमआयडीसी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या आहेत़ पोलिसांनी नाफेडच्या मार्केटिंग अधिकाऱ्याला पत्र दिले असून, याबाबत माहिती देण्याचे सांगितले आहे़ याबाबत मार्केटिंग अधिकारी मगेर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या तुरीबाबत माहिती घेण्यासाठी पाथर्डी बाजार समितीला पत्र दिले असून, गुरूवारी याबाबत माहिती येणार आहे़ तूर खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप पाथर्डी येथील तूर खरेदीत अपहार होत असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे़ यामध्ये पाथर्डी बाजार समितीच्या संचालकांनी नाफेडचा बारदाना बाहेर नेऊन शेतकऱ्याचा माल असल्याचे दाखवून व्यापाऱ्याकडील तूर खरेदी केली आहे़ तसेच ही तूर भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये खाली केली जाते़ याबाबत योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ पोलिसांनी पकडलेली तूर याच गैरव्यवहारातील असल्याची चर्चा सध्या पाथर्डीत आहे़ नाफेड अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतर या तूर प्रकरणाचे भिंग फुटेल़