लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावरील एम्स रुग्णालय ते फलटण पोलीस चाैकीदरम्यानची अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्याची तयारी दर्शविली आहे.
नगर- पुणे महामार्गावरील कोठला परिसरात वाहतुकीची कोंडी होते. व्यावसायिकांनी रस्त्यात हॉटेल व दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक शाखेने याबाबत महापालिकेला कळविले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागाची पाहणी केली असता २० पक्की अतिक्रमणे आहेत. अतिक्रमणधारकांशी मनपाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून, काहींनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याची तयारी दर्शविली आहे. अतिक्रमण काढून घेण्यासाठी पालिकेनेही मुदत दिली असून, दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे काढून न घेतल्यास अतिक्रमणांवर हातोडा चालविला जाणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
....
अतिक्रमण हटाव मोहीम
महापालिकेच्यावतीने शहरासह उपनगरांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. मोठी अतिक्रमणे न काढता लहान-मोठ्या अतिक्रमणांवर हातोडा चालविला जात आहे, अशी टीका मनपाच्या या मोहिमेवर होत असून, पालिकेने मोठी अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
...
सूचना: १९ कोठला नावाने फोटा आहे.