शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांना परमेश्वर मानण्यात गैर काय?

By admin | Updated: September 19, 2014 23:38 IST

शिर्डी (जि.अहमदनगर) : कणाकणात परमेश्वरांचा अंश असतो असे मानणारी आमची संस्कृती आहे़

शिर्डी (जि.अहमदनगर) : हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत़ त्यात साईबाबांचा समावेश केला तर गैर काहीच नाही, असे मत व्यक्त करीत कणाकणात परमेश्वरांचा अंश असतो असे मानणारी आमची संस्कृती आहे़ साईबाबा तर त्यापेक्षा मोठे आहेत़ त्यामुळे त्यांच्यातही परमेश्वर आहेच़ पण कदाचित शंकराचार्यांना हे दिसत नसेल, असे परखड मत प्रयाग येथील महिला परी आखाड्याच्या प्रमुख जगतगुरू शंकराचार्य त्रिकाल भवन्ता यांनी शिर्डीत व्यक्त केले़त्रिकाल भवन्ता महाराज यांनी शुक्रवारी शिष्यांसह दर्शनासाठी साईदरबारी हजेरी लावली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी साईबाबांना परमेश्वर मानणे किंवा न मानणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे़ करोडो भाविक साईबाबांना गुरू मानतात़ गुरूचे स्थान परमेश्वराहुनही मोठे असते़ त्यामुळे बाबांना परमेश्वर मानणे काहीच गैर नसल्याचे मत त्रिकाल भवन्ता यांनी व्यक्त केले़ शंकराचार्यांनी बाबांच्या देवत्वावर आक्षेप घेणे किंवा त्यांच्या मूर्ती हटवण्याच्या सूचना देणे गैर आहे़ हा आस्थेचा विषय असून आपण त्यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी त्यांचे स्वागत केले़ त्यांनी येथील पुजापाठ समजून घेण्यात विशेष रुची दाखवली़ (तालुका प्रतिनिधी)देशभर महिला आरक्षणासाठी आग्रह धरला जात असताना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी महिला संत व भाविकांनाही आरक्षण असावे, त्यांच्यासाठी वेगळी सुविधा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत़ नाशिक कुंभमेळ्यात महिला आखाड्यासाठी स्नानाला स्वतंत्र जागा असावी अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचेही त्रिकाल भवन्ता यांनी सांगितले़ काही जण कुंभमेळ्यात दंगामस्ती करतात ही बाबही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले़धर्माचीही साफसफाईमहिला घरापासून राजकारणापर्यंत सर्वत्र स्वच्छता करतात़ महिला संत धर्माचीही साफसफाई करतील़ त्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही त्या म्हणाल्या़ महिलांवर होणारे अत्याचार हे धर्मगुरूंचे अपयश असल्याचे सांगत प्रत्येक महिलेकडे माता-भगिनीच्या दृष्टीने बघितल्यास असे प्रकार होणार नाहीत, असा दावा करीत मुलींच्या आखूड कपड्यांमुळे अशा घटना घडत असल्याचा त्यांनी इन्कार केला़ उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली गंगा स्वच्छता मोहीम यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़