शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे नेमके काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST

अहमदनगर : राज्यात सन २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. परंतु कामे झालेल्या ...

अहमदनगर : राज्यात सन २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. परंतु कामे झालेल्या २०० ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. त्यामुळे ही योजना फोल ठरली असून त्यात गैरव्यवहार झाल्याचे सर्व पुरावे देऊनही अद्याप चौकशी का झाली नाही?, असा सवाल भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला आहे. या योजनेत कृषी विभागामार्फत सर्वाधिक कामे आणि सर्वाधिक गैरकारभार झाल्याचा आरोप भारतीय जनसंसदने एप्रिल २०१६ मध्ये केला होता. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी जलयुक्त शिवार अभियानाच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी अहमदनगर येथे समिती आली होती. भारतीय जनसंसदेने समितीला कागदोपत्रांसह हा घोटाळा सिद्ध करून दिला.

ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले, त्या सुमारे २०० गावांमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागले. त्यामुळे ही योजना सपशेल फेल झाल्याची टीका सुधीर भद्रे यांनी केली. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप चौकशी समितीने तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचे नेमके काय झाले? याची कसलीही माहिती दिलेली नाही. ही बाब संभ्रम निर्माण करणारी आहे. चौकशी समितीने तातडीने ठेकेदार आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रत्येक गाव आणि प्रत्येक कामनिहाय पुस्तिका तयार करून जनतेसमोर मांडावी. म्हणजे नेमकी कामे केली किती? आज अस्तित्वात आहेत किती आणि त्या कामांचा टंचाईमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी उपयोग झाला किती? हे समजण्यास मदत होईल, अशी मागणी भारतीय जनसंसदचे ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, अशोक सब्बन, अशोक ढगे, कैलास पठारे, अशोक डाके, सुनील टाक व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.