शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी पाणलोट क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST

श्रीगोंदा : दीड महिन्यांपासून कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. मात्र, दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पावसाची संततधार सुरू ...

श्रीगोंदा : दीड महिन्यांपासून कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. मात्र, दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उभ्या पिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या प्रकल्पात १७ हजार ९१३ एमसीएफटी म्हणजेच ६० टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवघा ८ टक्के अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ हजार ५२२ एमसीएफटी इतका उपयुक्त पाणीसाठा होता.

सध्या कुकडी प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये डिंभे धरणात ११ हजार १०० एमसीएफटी पाणी आहे. बाकी सर्व धरणात अवघे सात हजार एमसीएफटी पाणी आहे. त्यामुळे भविष्यात कुकडी लाभक्षेत्रात भयानक अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाणलोट क्षेत्रात पाऊस थंडावला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. प्रकल्पातील येडगाव धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र, धरणातून १ हजार ४०० क्युसेकने आवर्तन सोडले आहे. त्यामुळे येडगावातील पाणीसाठा ४९ टक्के झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस न आल्यास येडगावमधून सुरू असलेले आवर्तनही बंद होईल. घोड धरणात १ हजार २५९ एमसीएफटी २६ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर लाभक्षेत्रासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे घोड धरणातील साठाही ६ टक्क्यांनी कमी झाला आहे.

----

कुकडी प्रकल्पातील धरणनिहाय पाणीसाठा

येडगाव ९४९ एमसीएफटी ४९ टक्के, माणिकडोह ४ हजार ३१२ एमसीएफटी ४२ टक्के, वडज ५९२ एमसीएफटी ५० टक्के, डिंभे ११ हजार १०० एमसीएफटी ८९ टक्के, पिंपळगाव जोगे ९५१ एमसीएफटी २४ टक्के, घोड १ हजार २५९ एमसीएफटी २६ टक्के, विसापूर ३१ एमसीएफटी ४ टक्के, सीना ५०६ एमसीएफटी २७ टक्के, खैरी ३० एमसीएफटी ६ टक्के.