वडझिरेत चोरट्यांनी चार घरे फोडली; सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:20 IST2020-07-08T11:19:44+5:302020-07-08T11:20:17+5:30

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे चोरट्यांनी मंगळवारी (७ जुलै) रात्री धुमाकूळ घालीत लंके वस्तीवरील चार घरे फोडली. यात सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे.

In Wadzire, thieves broke into four houses; Cash lengthened with gold jewelry | वडझिरेत चोरट्यांनी चार घरे फोडली; सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लांबविली

वडझिरेत चोरट्यांनी चार घरे फोडली; सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लांबविली

पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथे चोरट्यांनी मंगळवारी (७ जुलै) रात्री धुमाकूळ घालीत लंके वस्तीवरील चार घरे फोडली. यात सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे.

वडझिरे गावातील पारनेर रस्त्यावर असणा-या लंकेवाडी भागात चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालून शंकर दशरथ लंके, पोपट गहिनाजी लंके, निवृत्ती गहिनाजी लंके, पांडुरंग निवृत्ती लंके या चार घरात चोरी करून दागिण्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. यामुळे वडझिरे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 

दरम्यान, बुधवारी सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमकी किती रक्कम व सोने चोरीला गेले याबाबतच तपशील अद्याप मिळू शकला नाही. 

Web Title: In Wadzire, thieves broke into four houses; Cash lengthened with gold jewelry