वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक साठेला १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 23:56 IST2025-09-17T23:55:59+5:302025-09-17T23:56:41+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक साठेला १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पारनेर ( जिल्हा अहिल्यानगर) : तालुक्यातील कुरुंद येथील तक्रारदाराची सातबारा नोंद करण्यासाठी वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक भिमाजी साठे( वय ३६) याला १० हजाराची लाच घेताना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई बुधवारी ही कारवाई केली असून ८ हजार लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याच्यावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा व दोन पुतणे यांच्या नावावर १ एकर २० गुंठे जमीन त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केली होती. परंतु याची सातबारा नोंद करण्यासाठी वाडेगव्हाणचे ग्राम महसूल अधिकारी दीपक साठे यांच्याकडे गेले असता कुरुंद गावचा कारभार हा दुसऱ्या तलाठ्या कडे गेलेला आहे.परंतु त्यांना डिजिटल सिग्नेचर प्राप्त न झाल्याने तुमचे काम मी करणार आहे. त्यामुळे या सातबाराच्या नोंदीसाठी मला १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी १७ सप्टेंबर रोजी तक्रारदार शेतकऱ्याकडे केली.
त्यानुसार या संबंधी नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केल्यानंतर या सातबाराची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयाची आठ हजार रुपयांची लाच स्वरूप पंचांसमक्ष घेतली असून यासंबंधी अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित महसूल सेवक दीपक साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी अप्पर अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे पोलीस निरीक्षक राजेंद्र आल्हाट पोलीस नाईक चंद्रकांत काळे शेखर वाघ किशोर कुळधर चालक दशरथ लाड यांनी ही कारवाई केली आहे.