स्वराने फोडला टाहो... उपस्थित गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:36+5:302021-07-08T04:15:36+5:30
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंगळवारी ...

स्वराने फोडला टाहो... उपस्थित गहिवरले
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंगळवारी आरोग्य केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मूळचे नेवासा तालुक्यातील बहिरवाडीचे होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डीहून नगर व तेथून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या गावी बहिरवाडीला अंत्यसंस्कार करण्यात आले. पप्पा मला खूप जीव लावायचे. आता पप्पा कुठे गेले, ते माझ्याबरोबर बोलत का नाहीत, मला पप्पासोबत जायचं, असे म्हणत डॉ. शेळके यांच्या स्वरा या पहिलीत शिक्षण घेत असलेल्या मुलीने चितेला अग्नी दिल्यानंतर हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितही आपले अश्रू रोखू शकले नाहीत.
अंत्यसंस्कारावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शेळके यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
-----------------