यादव म्हणाले, या यंत्रणेचे प्रात्यक्षिक गुरुवारी कर्जत पोलिसांनी पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी ठेवले होते. प्रात्यक्षिक ऐकल्यानंतर सर्वांकडून एक डेमो करून घेण्यात आला. यावेळी यादव बोलत होते. ही यंत्रणा सुरू होण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मदत व मार्गदर्शन करून पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुक्यातील सर्व गावांनी सदर यंत्रणा सुरू करून प्रभावी वापर करावा.
कार्यक्रमाकरिता तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी नगरपंचायत गोविंद जाधव, सपोनि. सुरेश माने, पत्रकार आशिष बोरा, मच्छिंद्र अनारसे, गणेश जेवरे, अफरोज पठाण, सुभाष माळवे, मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण तसेच कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हजर होते.