Video: रेल्वे बांधकाम विभागाच्या ऑफिसला आग, अग्निशमन बंब उशीरा पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:00 IST2022-04-05T15:59:23+5:302022-04-05T16:00:06+5:30
स्टेशनवरील फलाट क्रमांक एक वर क्रॉसिंगसाठी एक्सप्रेस गाडी थांबलेली असताना ही आग लागली.

Video: रेल्वे बांधकाम विभागाच्या ऑफिसला आग, अग्निशमन बंब उशीरा पोहोचले
पुणतांबा ( जि. अहमदनगर): राहाता तालुक्यातील पुणतांबा रेल्वे जंक्शनच्या फलाट क्रमांक एकला खेटून असलेल्या रेल्वेच्या बांधकाम विभागा (आयओडब्ल्यू) च्या अफिस व स्टोअर रूमला अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून मोठी दुर्घटना टळली आहे.
अहमदनगर (पुणतांबा) - रेल्वेच्या बांधकाम विभागा (आयओडब्ल्यू) च्या अफिस व स्टोअर रूमला pic.twitter.com/zhL49ECMRw
— Lokmat (@lokmat) April 5, 2022
स्टेशनवरील फलाट क्रमांक एक वर क्रॉसिंगसाठी एक्सप्रेस गाडी थांबलेली असताना ही आग लागली. रेल्वे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असून आग मोठी असल्याने आटोक्यात येत नव्हती. आग लागून अर्धा तासाच्या वर झाले असले तरी दुर्घटना स्थळी अग्निशमन बंब पोहोचले नसल्याने बादली व वाळू यानेच आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू होता. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी इंजिनिअर डिपार्टमेंट चे कागदपत्रे,तसेच सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.