शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 15:03 IST

घोगरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील हेमंत आप्पासाहेब बोरुडे (वय २८) हे जागीच ठार झाले

आॅनलाइन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ ३ - नगर-सोलापूर मार्गावर मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घोगरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील हेमंत आप्पासाहेब बोरुडे (वय २८) हे जागीच ठार झाले तर पाठीमागे बसलेले असलम शेखलाल शेख (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घोगरगाव बसस्थानकानजिक हेमंत बोरुडे यांचे हॉटेल आहे़ तर बाजूलाच अस्लम शेख यांचे मोबाईल शॉप आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर हेमंत बोरुडे हे आपल्या दुचाकीवरून ( एम. एच.१६. एके- ९९९०) असलम शेख याला घरी सोडविण्यासाठी निघाले होते. नगरच्या दिशेने काही अंतर पुढे गेल्यानंतर समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, हेमंत बोरुडे हे बाजूला उडून पडले. डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर असलम शेख यांच्या डोक्याला, हातापायला मार लागून ते गंभीर जखमी झाले़ त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस पाटील सुदाम बोरुडे यांनी श्रीगोंदा पोलिसांना घटनेची माहिती देत अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. हेमंत बोरुडे यांचे अपघातात निधन झाल्याचे समजताच संपूर्ण घोगरगाववर शोककळा पसरली. त्यांच्यामागे, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सुधाकर ससाणे हे करत आहेत.