पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मूत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:12 IST2020-08-08T16:11:56+5:302020-08-08T16:12:34+5:30

र्जत तालुक्यातील रातंजन येथे दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ आॅगस्ट) तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ही दोन्ही मुले नदीवर पोहण्यासाठी गेली होती. 

Two school children drowned in Sina river | पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मूत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मूत्यू

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील रातंजन येथे दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ आॅगस्ट) तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ही दोन्ही मुले नदीवर पोहण्यासाठी गेली होती. 

     सिध्दार्थ विजय काळे (वय १६),  तेजस सुनील काळे  (वय १५) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.  सीना नदीतून बेसुमार वाळू उपसा असल्याने याठिकाणी वीस फूटापर्यत खड्डे आहेत. बºयाच दिवसांनी सीना नदी वाहती झाल्याने ही मुले पोहण्यासाठी नदीवर गेली होती. पाण्यात या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही खोल पाण्यात बुडाली. 

घटनेची माहिती समजताच गावातील तरूणांनी सुमारे अर्धा तास पाण्यात बुड्या घेऊन या मुलांचे मृत बाहेर काढले. पाच वषार्पूर्वी याच गावात दोन मुलांचा असाच पाण्यात बुडून अंत झाला होता. घटनास्थळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तातडीने भेट दिली .

Web Title: Two school children drowned in Sina river