अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील मार्केट यार्ड चौकात कारमधून विनापरवाना नेण्यात येणारी २ लाख १४ हजार ९५० रुपयांची विदेशी दारू पकडली़ यावेळी इंडिका कारसह चालकास ताब्यात घेण्यात आले़ ही दारू विकणारा मुख्य आरोपी मात्र यावेळी फरार झाला़नगर शहरातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ पथकाने सापळा रचून नगर-पुणे रोडवरील मार्केट यार्ड चौकात संशयित इंडिका कारची तपासणी केली असता आतमध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले़ यावेळी सोमनाथ दत्तू गोरे (वय ३१ रा़ भांडेवाडी ता़ कर्जत) याला ताब्यात घेण्यात आले़ गोरे याला दारू देणारा विशाल सुरेश ठाणगे हा यावेळी फरार झाला़ ही दारू श्रीरामपूर येथून आणून गोरे याला विकली असल्याचा पोलिसांना संशय आहे़ या प्रकरणी दोघा आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दोन लाखांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 16:39 IST
नगर शहरातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़
दोन लाखांची दारू पकडली
ठळक मुद्दे कारसह चालक ताब्यात: दारू विकणारा फरार