नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरजवळ भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 12:21 IST2019-01-18T11:27:11+5:302019-01-18T12:21:41+5:30

ट्रक व कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

two killed and four injured in accident near sangamner | नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरजवळ भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरजवळ भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

ठळक मुद्देट्रक व कारच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा-दुमाला गावच्या शिवारात हा अपघात झाला. जखमींवर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमनेर : ट्रक व कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (18 जानेवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा-दुमाला गावच्या शिवारात हा अपघात झाला. 

भूषण दिलीप वाळेकर (33), आर्यन जयंत सांत्रस (14)अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. जयंत शामसुंदर सांत्रस, मोहिनी जयंत सांत्रस (42), उषा शरद लोहारकर (60), देवयानी भूषण वाळेकर (23) हे चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड काँस्टेबल विजय खंडीझोड, पोलीस नाईक सचिन उगले आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात हलविले. भूषण वाळेकर व आर्यन सांत्रस यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आले असून जखमींवर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: two killed and four injured in accident near sangamner