शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाईल करा बंद, झाडांपासून राहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

अहमदनगर : वीज कडाडताच मोबाईल बंद ठेवावेत, झाडांपासून, दारे-खिडक्यांपासून दूर राहावे, टी. व्ही. बंद करावा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर ...

अहमदनगर : वीज कडाडताच मोबाईल बंद ठेवावेत, झाडांपासून, दारे-खिडक्यांपासून दूर राहावे, टी. व्ही. बंद करावा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवावा. संगणक, फ्रिजही बंद ठेवावा, मोकळ्या मैदानात थांबू नये, अशी खबरदारी पावसाळ्यात घ्यावी. त्यामुळे वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटू शकते. जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत ४१ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षीही जिल्हाभर दमदार पाऊस झाला. यंदाही हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसा हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पाऊसही सुरू झाला. पावसाळ्यात वीज पडून मनुष्यहानीसह जनावरांच्या मृत्युचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर खबरदारी घेणे गरजेचे असते. मात्र, याबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसते. त्यामुळे वीज पडून मनुष्यहानी होण्याचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात २०१६/१७ मध्ये १३, तर २०१७/१८ मध्ये १२ असे बळी गेले आहेत. २०१८/१९ मध्ये ६, २०१९/२०२० मध्ये ५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला.

---

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?

जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शासकीय वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, ती यंत्रणा सुरू आहे की बंद याबाबत प्रशासनाकडेच माहिती उपलब्ध नाही. नव्या शासकीय इमारती, मोठमोठ्या खासगी इमारती, विद्युत विभागाचे मोठे टॉवर, मोबाईल टॉवर आदींवर वीज अटकाव यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणांवर असलेल्या वीज अटकाव यंत्रणांच्या भरवशावरच सध्या जिल्ह्यात वीज अटकाव करण्याचे काम सुरू आहे.

-----

वीज पडल्याने झालेले मृत्यू

वर्ष मृत्यू संख्या

२०१६/१७ १३

२०१७/१८ १२

२०१८/१९ ६

२०१९/२० ५

२०२१ जुलैपर्यंत ५

-------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

वीज कडाडत असताना तत्काळ सुरक्षितस्थळी जावे. घरात किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. दारे, खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारा, केबल, पाईपमधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाण्यात उभे असाल तर बाजूला व्हा, उंचावर असाल तर सुरक्षित जा. झाडाखाली, मोकळ्या मैदानात उभे राहू नका. स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. टी. व्ही., संगणक, फ्रीज बंद ठेवा. त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) बंद ठेवा. लँडलाईन बंद ठेवा. त्याचा प्लग काढून ठेवा. मोबाईल चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून ठेवा. चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. एखाद्या वाहनात असेल तर त्यातच बसून राहा. छत नसलेल्या वाहनात बसणे टाळावे, असे आवाहन शेवगावचे सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी केले.