नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक पेटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 14:37 IST2019-04-30T14:37:27+5:302019-04-30T14:37:36+5:30

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुण्याकडे राख घेऊन जाणारा ट्रक (हायवा) पेटला.

Truck accident on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक पेटला 

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक पेटला 

संगमनेर (जि. अहमदनगर)  : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुण्याकडे राख घेऊन जाणारा ट्रक (हायवा) पेटला. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. (एमएच-१२-पीक्यू-३७३८) या ट्रकमध्ये राख भरली होती. चालक हा ट्रक घेऊन पुण्याकडे निघाला होता. मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ ट्रक आला असता ट्रकच्या मागील टायरने अचानक पेट घेतला. टायरला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ट्रक थांबविला. त्याने व सहाय्यक चालकाने बाहेर उडी घेतली. काही क्षणातच हा ट्रक पेटल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. दरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Truck accident on Nashik-Pune highway

टॅग्स :Accidentअपघात