मांडवगण येथील मुलींच्या शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:09+5:302021-03-09T04:24:09+5:30
या कार्यक्रमास मांडवगणच्या सरपंच सुलभा सदाफुले, डॉ. रिझवान शेख, डॉ. अमोल जाधव, रोटरीचे अध्यक्ष रफीक मुन्शी, डॉ. चंदना शहा, ...

मांडवगण येथील मुलींच्या शाळेत वृक्षारोपण
या कार्यक्रमास मांडवगणच्या सरपंच सुलभा सदाफुले, डॉ. रिझवान शेख, डॉ. अमोल जाधव, रोटरीचे अध्यक्ष रफीक मुन्शी, डॉ. चंदना शहा, डॉ. मनोज लोंढे, शुभश्री पटनाईक, राजेेंद्र घोडके, सुरेश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य शिबिर व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी इंटिग्रिटी क्लबच्यावतीने विद्यार्थिनींना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मुलींनीही भाषणे केली. प्राचार्य चंदना शहा-गांधी यांनी महिलांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अमोल जाधव यांनी रक्ततपासणी शिबीर घेण्याचे जाहीर केले. शोभा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते निवासी शाळेत २५ केशर आंब्यांचे रोपण करण्यात आले. एन. पी. पटेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पी. के. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.----------
फोटो- ०८ मांडवगण
जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी इंटिग्रीटी क्लबतर्फे मांडवगण येथील मुलींच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रफिक मुन्शी, डॉ. अमोल जाधव, डॉ. रिझवान अहमद, प्रा. चंदना शहा-गांधी, डॉ. मनोज लोंढे आदी उपस्थित होते.