कोरोना रुग्णांवरील उपचार आता खासगी डॉक्टरांना परवडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:45+5:302021-06-04T04:16:45+5:30

राज्य शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा ‘क’ वर्गात समावेश ...

Treatment of corona patients is no longer affordable to private doctors | कोरोना रुग्णांवरील उपचार आता खासगी डॉक्टरांना परवडेनात

कोरोना रुग्णांवरील उपचार आता खासगी डॉक्टरांना परवडेनात

राज्य शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा ‘क’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने हे दर जाहीर केले आहेत. या दराप्रमाणेच उपचार करणे आता खासगी रुग्णालयांना सक्तीचे राहणार आहे. या निर्णयासाठी सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला असला तरी हे दर आम्हाला परवडत नाहीत, अशी भूमिका खासगी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यात क वर्गातील जिल्ह्यात उपचाराचे दर अत्यंत कमी असल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-----

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे म्हणजे धोका पत्करून काम करावे लागते. इतर वेळी तीन हजार रुपयांना मिळणारे ऑक्सिजनचे एक ड्युरा सिलिंडर कोरोनाच्या काळात १८ हजार रुपयांना विकत घ्यावे लागले. रुग्णालयातील स्वच्छता, असिस्टंट डॉक्टर, वॉर्डबॉयचे पगार दुप्पट द्यावे लागतात. इतर पूरक साहित्य व औषधांच्या किमतीवर नियंत्रण नाही. मात्र फक्त बिलांवर नियंत्रण आणणे अयोग्य व अन्यायकारक आहे.

- डॉ. सचिन वहाडणे, इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा अहमदनगर

-----

असा आहे वाढता खर्च

वॉर्डबॉय- २० हजार रुपये महिना

सिस्टर - ४० ते ५० हजार महिना

असिस्टंट डॉक्टर-७० ते ८० हजार महिना

ऑक्सिजन सिलिडर- १८००० ( प्रति ड्युरा सिलिंडर, सहापट वाढ)

दैनंदिन दुरुस्ती- देखभाल खर्च- क्षमतेनुसार

--------

उपचाराचे दर घटले

वार्ड स्वरूप/ पूर्वीचे दर / सध्याचे दर

रुटीन वार्ड/४०००/२४००

आयसीयू/७५००/४५००

आयसीयू विथ व्हेंटिलेटर/९०००/५४००

----------

Web Title: Treatment of corona patients is no longer affordable to private doctors