व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:23+5:302021-04-07T04:22:23+5:30
वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानची मागणी वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष प्रतीक बोगावत, उपाध्यक्ष कुणाल नारंग, आदित्य गांधी, महावीर कांकरिया, ...

व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानची मागणी
वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष प्रतीक बोगावत, उपाध्यक्ष कुणाल नारंग, आदित्य गांधी, महावीर कांकरिया, सेक्रेटरी ईश्वर बोरा, पवन किथानी, केतन मुथा, पवन फिरोदिया आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने एक जाहीर केले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरेच आदेश जिल्ह्यात लागू करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांची एकप्रकारे फसवणूक झाली आहे. या निवेदनात दुकाने बंद असली तरी व्यापाऱ्यांना नियमित कोणता खर्च करावा लागतो, याचे विवरण दिले आहे. व्यापार, व्यवसाय बंद असेल तर व्यापारी आर्थिक अडचणीत येईल. राज्याच्या परिपत्रकाप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. तसेच जिल्ह्याचा काढण्यात आलेला आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा.
-----------
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकानासमोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजिकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन उपस्थित होते. मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापाऱ्यांचे दिवाळे निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या टाळेबंदीत व्यापारी स्वत:हून बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
--
फोटो आहेत.