ट्रॅक्टर ट्रेलर-टँकर अपघातात चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:17 IST2021-02-27T11:17:18+5:302021-02-27T11:17:54+5:30

उसाचा टॅक्टर ट्रेलर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर‌-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर घडला.

Tractor trailer-tanker crash kills driver | ट्रॅक्टर ट्रेलर-टँकर अपघातात चालक ठार

ट्रॅक्टर ट्रेलर-टँकर अपघातात चालक ठार

श्रीगोंदा : उसाचा टॅक्टर ट्रेलर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर‌-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर घडला.

   बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. दुधाचा टँकर बारामतीवरून नाशीकला दूध भरण्यासाठी जात होता. यावेळी नागवडे साखर कारखान्याकडे जाणा-या उसाच्या टेलरची व टँकरची समोरासमोर धडक झाली.

    यात टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना लोणीव्यंकनाथ युवकांनी तातडीने दवाखान्यात पाठविले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

Web Title: Tractor trailer-tanker crash kills driver