आज शुद्धलेखन स्पर्धा

By Admin | Updated: June 1, 2014 00:23 IST2014-05-31T23:40:35+5:302014-06-01T00:23:13+5:30

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच सभासदांसाठी रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजता शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Today the Spelling Contest | आज शुद्धलेखन स्पर्धा

आज शुद्धलेखन स्पर्धा

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच सभासदांसाठी रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजता शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावेडीतील बिगबाजार समोरील गायकवाड सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. स्पर्धेसाठी तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट- १ ली ते ३ री, दुसरा गट- ४ थी ते ६ वी, तिसरा गट- ८ वी ते १० अशा तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. मुलांनी ३० मिनिटात शुद्धलेखन पूर्ण करावयाचे आहे. शुद्धलेखनासाठी ए-४ आकाराचा पेपर व पॅराग्राफ देण्यात येईल. स्पर्धेसाठी लोकमत बालविकास मंचचे ओळखपत्र आवश्यक असून, स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी लोकमत बालविकास मंचच्या संयोजिका प्रियांका चिखले (मो. ९९६०५६९०६३) यांच्याशी संपर्क साधावा़ या स्पर्धेसाठी पी. जी. स्टेशनर्सचे हर्षल शहा यांनी प्रायोजकत्व दिले आहे. शुद्धलेखन स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य मुलांनी सोबत आणावे. प्रत्येक गटातून विजेत्यास प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन अशी एकूण पंधरा आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. (प्रतिनिधी)

Web Title: Today the Spelling Contest